चांदोरी : चांदोरी (ता निफाड) येथील जोरदार पावसाने गोदावरी नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे येथील गोदापात्रातील मंदिरांना पानेवलींनी वेढा दिला होता. पानवेलींचा हा विळखा मंदिरांना आजही कायम आहे.नाशिक व त्र्यंबकेश्वर भागात जोरदार पावसामुळे गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडल्या मुळे गोदावरी नदीला पूर आला होता. त्यामुळे लाखलगाव ओढा, चाटोरी, दारणसांगवी, सायखेडा व चांदोरी या भागातील नदी पत्रात पानवेली चे प्रमाण खूप होते .परंतू पूर पाण्याचा प्रवाह वेग जोरादार असल्यामुळे त्या सर्व पानवेळी पाण्यासोबत वाहून गेल्या.काही चांदोरी सायखेडा पूलाला अडकल्या त्या पण काढल्या व मात्र चांदोरी येथील खूप प्राचीन कालीन हेमाडपंथी मंदिर हे नदी पात्रात असल्याने काही मंदिरे जास्त उंचीचे व काही मंदिरे कमी उंचीचे आहे ही पानवेली त्या मंदिरांना अडकलेली आहेत.चांदोरी-सायखेडा जुना पूलाला सुद्धा पानवेली चा विळखा पडलेला आहे.त्या पाणवेलीची परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्या पानवेली मूळे पाणी प्रवाहात मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.तसेच काही पानवेली हेमाडपंथी मंदिराना अडकलेली असल्याने त्यांना इजा होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे व नदी पात्रातील पाणी सुद्धा संथ आहे.या पानवेली ची दुर्गंधी, नदी परिसरातील अस्वछता यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य व जलचर जीव धोक्यात येऊ शकते. व ही हेमाडपंथी मंदिरे व खंडेराव मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी दुरून पर्यटक येत असतात व त्यांना या दृश्यामुळे नाराजी पसरत आहे.यामुळे प्रशासनाने या पानवेली कडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटक करत आहे.
पानवेलींचा मंदिरांना विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 6:18 PM
चांदोरी : चांदोरी (ता निफाड) येथील जोरदार पावसाने गोदावरी नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे येथील गोदापात्रातील मंदिरांना पानेवलींनी वेढा दिला होता. पानवेलींचा हा विळखा मंदिरांना आजही कायम आहे.
ठळक मुद्देपरिसरात दुर्गंधी अस्वछतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात