नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवारी महामंडळाच्या बसेसला झालेली गर्दी आणि वाहकांच्या प्रदीर्घ ड्यूट्यांमुळे त्यांच्याजवळील तिकीट मशीन हॅँग तसेच आउटआॅफ सर्व्हिस झाल्याने अनेक ग्राहकांच्या हाती पुन्हा एकदा जुन्या जमान्यातील आकड्यांचे कागदी तिकीट पडले. अनेक वर्षांनी अशाप्रकारचे तिकीट मिळाल्यामुळे ग्राहकांनीही कुतुहलाने तिकीट न्याहाळले.तिसºया श्रावण सोमवारनिमित्ताने भाविकांची होणारी गर्दी तसेच शहरातील अन्य भागांतून नाशिकला येणाºया भाविकांचीदेखील गर्दी वाढल्याने दिवसभर बसेसला मोठी गर्दी झाली होती. यात्रा उत्सवाच्या काळात चालक आणि वाहकांनाअधिकची सेवा करावी लागत असल्यामुळे त्यांच्याही तिकीट मशीनवर ताण येतो. याचा परिणाम म्हणून अनेक वाहकांकडील तिकीट मशीन हॅँग झाले तर काहींचे मशीन काम करीत नसल्याने ऐनवेळी कोणताही खोळंबा होऊ नये यासाठी वाहकांना जुने कागदी तिकीट किट देण्यात आले होते. त्यामुळे अनेक मार्गांवर मशीनमधील बिघाडामुळे प्रवाशांना जुने तिकीट देण्यात आले. तिकीट मशीनचा वापर सुरू केल्यानंतर जुन्या तिकिटांचा वापर बंद करण्यात आला आहे. मात्र ही तिकिटे बाद करण्यात आलेली नाहीत. अटीतटीच्या काळात सदर तिकिटांचा वापर करण्याच्या इराद्याने सदर तिकिटे कायम ठेवण्यात आली असून, मशीनबरोबरच सदर तिकिटे तातडीची गरज म्हणून दिली जातात. त्यामुळे जेव्हा कधी चालत्या बसमध्ये मशीनचा बिघाड होतो अशावेळी तिकिटे वापरण्याची मुभा देण्यात आलेली आहे.पंचिंग उपकरण गायबबºयाच कालावधीनंतर जुनी तिकिटे बाहेर आली असली तरी पूर्वीप्रमाणे तिकिटाला छिद्रे पाडणारे ‘पंचिंग’ उपकरण वाहकांकडे नसल्याने प्रवाशांना अर्धे तिकीट फाडून देण्यात आल्याचा अनुभव एका प्रवाशाने कथन केला. रविवारी रात्री नाशिकरोडहून येणाºया नाशिकरोड-पंचवटी बसमध्ये प्रवाशांना अशाप्रकारचे तिकीट देण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाने तिकिटांसाठी मशीनचा वापर सुरू केल्यानंतर सदर ‘पंचिंग’ उपकरण हद्दपार झाले असेच या घटनेवरून दिसून आले.
मशीन हॅँग झाल्याने प्रवाशांच्या हाती पडले कागदी तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:37 AM