नाशिक : प्रीतिसुधाजी शिक्षण फंड, नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम स्तुत्य असून, भविष्यात आपण अशा उपक्रमासाठी सहाय्य करू, असे प्रतिपादन अशोका बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया यांनी रविवारी (दि. ३०) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक आणि कौशल्य पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले. जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी पुढे बोलताना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मेळावे घेणार असल्याचीदेखील माहिती यावेळी दिली. या पुरस्कार प्रदान सोहळ्याअंतर्गत नाशिक जिल्हा जैन समाजातील इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त, बारावीमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांसह सनदी लेखापाल, डॉक्टर, अभियंता आणि वकील अशा ७४ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना आठ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तींचेही वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऋ तुजा कांकरिया, राशी लोढा, पार्श्व दुगड, अनुजा बुरड, उत्सव राका, श्रेणिक नहार, मेहुल पारख, प्रेरणा जैन, वृषाली बोरा, रिद्धी कोठारी, सिद्धी पारख, भूषण ओस्तवाल, शुभम संघवी, करिश्मा पारख, ऐश्वर्या ब्रह्मेचा, प्रणीत भटेवरा, निकेत पारख, तेजस संचेती, सौरभ मोदी, दिनेश चोरडिया आदि विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, सुभाषचंद्र बाफणा, राजेंद्र बोरा, बसंतीलाल ललवाणी, मोतीवाल ओस्तवाल, डॉ. कन्हैयालाल कटारिया, रमेश साखला, चंपकलाल पारख, अरुण बुरड, स्वरूपचंद्र भंडारी, हेमंत बोथरा, अॅड. विद्युलता तातेड, लताबाई लोढा, प्रमिला पारख आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कोठारी, सूत्रसंचालन लोकेश पारख, तर आभार मोहनलाल लोढा यांनी मानले. यावेळी जैन बांधव उपस्थित होते.धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचेरमणिकमुनीजी म.सा. यांनी मार्गदर्शन करताना प्रीतिसुधाजी शिक्षण फंड यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणारा उपक्रम स्तुत्य असून, भविष्यातही या प्रकारचे उपक्रम कायम राबवायला हवेत हे सांगताना जीवनात शिक्षणाला महत्त्व द्यायला हवे, असे आवाहन केले. जीवनात प्रत्येकाने साधू-संतांच्या दर्शनाचा तसेच व्याख्यानाचा लाभ घेतल्यास जीवनाची योग्य दिशा सापडते. मानवी जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असून, यामुळे आपल्याला सुख-शांती लाभत असल्याचे रमणिकमुनी म.सा. यांनी यावेळी सांगितले.
प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:57 AM