महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित आभासी व्याख्यानमालेत "विवेकी पालकत्व" या विषयावर त्या बोलत होत्या. ॲड. दाभोळकर यांनी पुढे सांगितले की, विवेकी पालकत्वाची निश्चित अशी ठराविक चौकट नाही. आपल्या सभोवताली आपणास पालकत्वाच्या अनेक तऱ्हा आढळतात. कालानुरूप विविध बाबींमध्ये बदल होत असतो. त्यानुसार पालकत्वाच्या संकल्पनेतही बदल होत असतो. काही कृतींची व काही विचारांची जाणीवपूर्वक केलेली निवड म्हणजे पालकत्व असून, आपण कोणत्या कृती व कोणते विचार स्वीकारले आहेत, याची आपल्या मनात जागरुकता निर्माण करणे ही विवेकी पालकत्वाची पूर्वतयारी असते. भावना ओळखता आल्या पाहिजेत. त्या एकमेकांपासून वेगळ्या करता आल्या पाहिजेत. त्यांना नावे देता आली पाहिजेत. व्यक्तींना नावे देऊ नयेत. यावेळी त्यांनी लैंगिकता व व्यसनाधीनता या विषयावरदेखील त्यांनी पालकत्वाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पत्रकार दीप्ती राऊत होत्या.
समितीचे अध्यक्ष प्रा.संजीव पवार यांनी स्वागत केले. समन्वयक मिलिंद राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. उत्सव समितीचे अध्यक्ष धर्मा साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. देवयानी पाटील यांनी आभार मानले. यावेळी दिनेश पाटील, डी.आर. पाटील,जयदीप राजपूत, सुमित राजपूत, भवानसिंग सोलंकी ,महेंद्र राजपूत, सुनील पवार, किरण खाबिया, नितीन गिरासे, जयदीप पवार, राजेंद्र चौहाण, जयप्रकाश गिरासे, रामसिंग बावरी, वीरेंद्रसिंग टिळे, सुनील परदेशी, बबलूसिंग परदेशी आदीसह राजपूत समाज संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.