सिन्नर : चांगले काय हे समजल्याशिवाय चांगले घडत नाही. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेची गरज आहे. मात्र मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे मराठी बळकटीकरणाचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर उद्योजक राधाकिसन चांडक, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, उपाध्यक्ष अॅड. नागनाथ गोरवाडकर, डॉ. सुनील कुटे, सिन्नर संकुल प्रमुख श्रीपाद देशपांडे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, वैशाली गोसावी आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.चांगले शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे, त्यातून मातीतले भावविश्व समृद्ध होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांमध्ये चांगल्या इमारती उभ्या राहतात. ज्ञानाची भूकही इंटरनेटवरूनही भागवता येते. मात्र त्यातून पुस्तकी ज्ञान असलेले साचेबद्ध विद्यार्थी तयार होतात. मात्र संस्कार करणारे, चांगले आणि वाईटाला फरक समजावणारे व जीवनमूल्य शिकविणारे शिक्षक गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. जीवनमूल्य शिकविणाऱ्या संस्था व शिक्षकांची समाजाला गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी संस्थेच्या शतकीय वाटचालीचा आढावा घेतला. माधवी पंडित यांनी सूत्रसंचालन केले. श्रीपाद देशपांडे यांनी आभार मानले. ज्ञानदानाचे कार्यउद्योजक राधाकिसन चांडक यांनी संस्थेच्या कार्याचा उल्लेख करताना आणखी १० लाख रुपयांची देणगी घोषित केली. डॉ. विनायक गोविलकर यांनी संस्था संस्कारक्षम, सदृढ वातावरणात ज्ञानदानाचे कार्य करत असल्याचे सांगून सिन्नरकरांनी त्यास बळ द्यावे, असे आवाहन केले.
मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:44 AM
सिन्नर : चांगले काय हे समजल्याशिवाय चांगले घडत नाही. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेची गरज आहे. मात्र मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे मराठी बळकटीकरणाचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटनचांडक कन्या विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन