जळगाव नेऊर : एरंडगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुमैय्या पटेल होते. कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून येवल्याच्या पंचायत समिती नूतन सभापती कविता आठशेरे होत्या.शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी नृत्य तसेच नाट्य अभिनय सादर केला. कार्यक्र मात देशभक्तीपर गीते, लावणी, मराठी, हिंदी चित्रपट गीते, विविध नाटिका सादर केल्या.सैनिकांच्या जीवनावरील नाटीकेने तर सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. चिमुकल्यांचा अभिनय व नृत्य बघून उपस्थित सारेच मंत्रमुग्ध झाले.या कार्यक्र म प्रसंगी गावातील सिमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या मात्यापित्यांचा यथोचित सत्कार शाळा व्यवस्थापन समतिी तर्फे करण्यात आला. कार्यक्र मास शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, शिक्षक व शेतकी सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक सोनाली घावटे व राजेंद्र ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक नवनाथ कांगणे व शिक्षक मिनल बोडके यांनी कार्यक्र म यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
वार्षिक स्नेहसंमेलनात माता-पित्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 5:45 PM
जळगाव नेऊर : एरंडगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुमैय्या पटेल होते. कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून येवल्याच्या पंचायत समिती नूतन सभापती कविता आठशेरे होत्या.
ठळक मुद्देजळगाव नेऊर : एरंडगाव जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम