सीबीएसची दुरवस्था
नाशिक : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. स्थानकाच्या पाठीमागील बाजूस सर्वत्र केरकचरा पडला आहे. स्थानकाची एका बाजूची भिंत पडली आहे. पार्सल बाजूकडील भागात नेहमीच पाणी साचलेले असते.
दत्तमंदिर रस्ता कोंडीचा
नाशिकरोड : येथील दत्तमंदिर-मुक्तिधाम हा रस्ता अरुंद असून, वाढत्या वाहतुकीमुळे या मार्गावर नेहमीच कोंडी निर्माण होते. या मार्गावर अनेक दुकाने तसेच रहिवासी क्षेत्र असल्याने वाहनांची वर्दळ वाढली असल्याचे दिसते.
मुदत वाढविण्याची गरज
नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सांगण्यात आलेले आहे. सायबरमध्ये होणारी गर्दी आणि कोरोनाची भीती, त्यातच कमी असलेला वेळ, उत्पन्न दाखल्याचे वेटिंग यामुळे अर्ज दाखल करण्याची वेळ वाढविण्याची मागणी होत आहे.
ठिकठिकाणी खोदकाम
नाशिक : शहरात ठिकठिकाणी रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. अनेक ठिकाणी वाहनधारकांना वळसा घाळून जावे लागते. रात्रीतून काम सुरू केले जाते. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांची गैरसोय होते.