नाशिक : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता रविवार कारंजावरील यशवंत मंडई जमीनदोस्त करून त्याजागेवर बहुमजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी लवकरच निविदा मागवणार आहे. याशिवाय मध्यवर्ती अशा शिवाजी उद्यानाच्या नूतनीकरणासाठीदेखील अमृत योजनेतून निधी उपलब्ध झाल्याने साडेचार कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहे.यशवंत मंडई ही शहरातील अत्यंत जुनी मंडई असली तरी त्याचा वापर योग्य पद्धतीने होत नाही इमारतील अवकळा आली असल्याने अनेक गाळे रिकामे आहे, तर काही गाळे नावाला व्यावसायिकांनी घेऊन ठेवले आहेत. मंडई साकारताना सुरुवातीला असलेला उद्देश फसला आणि तेथे अनेक डॉक्टरांनी दवाखाने सुरू झाल्याने त्याला डॉक्टर मंडई असेदेखील उपहासाने म्हटले गेले. परंतु आता ही मंडई जमीनदोस्त होणार असून, त्याठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेने वाहनतळाची सोय केली नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहन रस्त्यावर उभी करतात त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न आणखी बिकट बनतो. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत येथे बहुमजली वाहनतळ बांधण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पंधरा दिवसांत निविदा मागविण्यात येणार आहे.मनपा काळातील शिवाजी उद्यानाचेदेखील आता रुपडे बदलणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेने प्रस्ताव सादर केला होता.
ंयशवंत मंडईच्या जागेवर आता वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:48 AM