सटाणा : नात्याने मामी असलेल्या बावीस वर्षीय विवाहितेवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बागलाण तालुक्यातील पारनेर येथे घडली. या प्रकरणी जायखेडा पोलिसात तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघे फरार आहेत. ही महिला शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सोंडी शिवारातून शेतावर जात असताना गावातील अमोल ऊर्फपिनू अशोक पवार (२६), नीलेश ऊर्फ सोन्या अशोक कापडणीस (२५), महेश ऊर्फ आबा केदा देवरे (२६) या तिघांनी तुमच्याकडे काम असल्याचा बहाणा करून महिलेस जवळच असलेल्या दौलत भदाणे यांच्या डाळिंबबागेत नेले. अमोल पवार याने अत्याचार केला. त्यानंतर सोन्या व आबा यांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. तिघा नराधमांनी घडलेल्या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित महिलेने संशयितांनी केलेल्या अत्याचाराबाबत तत्काळ जायखेडा पोलीस ठाण्यात तक्र ार केली. पोलिसांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात महिलेची वैद्यकीय तापसणी करून तिघांविरु द्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पारनेरला विवाहितेवर तिघांचा सामूहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:14 AM