लोकमत न्यूज नेटवर्कटेहरे : देशातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यास पंतप्रधानांना भाग पाडू, असे प्रतिपादन शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे केले.अखिल भारतीय किसान कर्ज मुक्ती यात्रा मंदसौर (म. प्र.) ते दिल्ली या संघर्ष यात्रेची जाहीरसभा येथे झाली त्यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विमल शेवाळे होत्या.प्रारंभी धुळे येथून आलेल्या संघर्ष यात्रेतील कार्यकर्त्यांनी १९८४ मध्ये झालेल्या आंदोलनस्थळी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.खासदार राजू शेट्टी संघर्ष यात्रा काढून संसदेत १७ तारखेला अधिवेशनात पंतप्रधानांना जाब विचारणार आहेत की आपण शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर दीड पट नफा देण्याचे जाहीर केले त्याचे काय झाले? भारतातून १४१ शेतकरी संघटनांचा या आंदोलनास पाठिंबा असून, १८ जुलै रोजी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर मध्य प्रदेशातील शहीद झालेल्या युवकांचे अस्थिकलश घेऊन आंदोलन करणार आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यास पंतप्रधानांना भाग पाडू. कार्यक्रमाला विदर्भाचे आमदार रवींद्र तुपकर, उत्तर प्रदेशाचे आमदार योगेंद्र यादव, व्ही. एम. सिंग, उत्तरांचलचे डॉ. सुनीलम, पश्चिम बंगालचे अन्वीक शाह, पंजाबचे रूल्दू सिंगजी, हरियाणाचे प्रेमसिंग गहलोत, उत्तर प्रदेशाचे पुरुषोत्तम शर्मा, उपेंद्रसिंह यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल निकम, शेखर पवार यांनी केले. यावेळी टेहरे, दाभाडी, पिंपळगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातबारा कोरा करण्यास पंतप्रधानांना भाग पाडू
By admin | Published: July 10, 2017 12:21 AM