नाशिक : कडाक्याच्या थंडीपासून नाशिककरांना सोमवारी (दि.११) अंशत: दिलासा मिळाला आहे. सकाळी किमान तापमानाचा पारा १०.२ अंशांपर्यंत वर सरकला. रविवारी शहराचे किमान तापमान ५ अंशांवर होते. तापमानात वाढ झाल्याचे दिसत असले तरी नाशिकचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता तापमान १३ अंशांच्या पुढे गेल्यानंतरच वातावरणात उष्मा जाणवतो.पाच दिवसांपासून शहरात थंडीचा प्रचंड कडाका वाढला होता. शुक्रवारी (दि.९) हंगामातील सर्वाधिक नीचांकी ४ अंश इतकी किमान तापमानाची नोंद झाली. डिसेंबर महिन्यात शहराचा पारा ५.३ अंशांपर्यंत खाली घसरला होता. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा जोर वाढल्याने उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीने महाराष्टÑाला सर्वाधिक प्रभावित केले. त्यामुळे थंड वारे अधिक वेगाने वाहू लागले होते. तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे थंडीचा जोर वाढला होता. त्यामुळे यावर्षी चक्क फेब्रुवारीमध्ये थंडीचा कडाका नागरिकांनी अनुभवला व सर्वाधिक नीचांकी किमान तापमान नोंदविले गेले.फेब्रुवारीपर्यंत थंडीची तीव्रता कमी झालेली असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात होते; मात्र यावर्षी ऋ तूमानाचे चक्र बदलल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.डिसेंबरच्या पंधरवड्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाशिककरांना यंदा तीव्र थंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नागरिक जेरीस आले आहे. नागरिकांना थंडी नक ोशी वाटू लागली आहे. वातावरणात उष्मा तयार होत नसल्यामुळे गारवा टिकून आहे.सोमवारी मात्र थंडीपासून काहीसा दिलासा मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान दिसून आले. पहाटे थंडीची तीव्रता जाणवत होती. मात्र सूर्योदय होताच तीव्रता कमी झाली. तीन दिवसांपासून दिवसभर जाणवणारा बोचरा वारा सोमवारी नागरिकांना जाणवला नाही. त्यामुळे थंडीपासून काहीअंशी तरी दिलासा मिळाल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती.
थंडीपासून अंशत: दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 1:04 AM
कडाक्याच्या थंडीपासून नाशिककरांना सोमवारी (दि.११) अंशत: दिलासा मिळाला आहे. सकाळी किमान तापमानाचा पारा १०.२ अंशांपर्यंत वर सरकला. रविवारी शहराचे किमान तापमान ५ अंशांवर होते. तापमानात वाढ झाल्याचे दिसत असले तरी नाशिकचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता तापमान १३ अंशांच्या पुढे गेल्यानंतरच वातावरणात उष्मा जाणवतो.
ठळक मुद्देपारा १०.२ अंशांवर : तापमानात ५ अंशांनी वाढ