नाशिक : कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्याचे आदेश दिले असले तरी मुंबईतील आझाद मैदानावर होणाºया संघटनेच्या उपोषणात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीचशे कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या कर्मचाºयांची साप्ताहिक सुटी आहे असे राज्यभरातील कर्मचारी या उपोषणाला उपस्थित राहणार असल्याचे समजते.वेतनवाढीच्या प्रमुख मागणीबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांकडे एसटी महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कामगार संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. यापूर्वी संघटनेने गेल्या ८ व ९ जून रोजी कामबंद आंदोलन पुकारल्याने एसटीची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती.ऐन दिवाळीतील आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाल्याने प्रशासनाने या आंदोलनातील कर्मचाºयांवर कारवाईदेखील केली होती. प्रशासनाने केलेल्या एकतर्फी वेतनवाढीला संघटनेने हरकत घेत काही सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र त्यावर महामंडळाकडून अद्यापही तोडगा काढला जात नसल्याने संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे.बुधवार, दि. ३० रोजी आझाद मैदान, मुंबई येथे संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार असून, या उपोषणासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी सहभागी होणार आहेत. कामगार संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये वेतनवाढीच्या मुद्द्यावरून पेच निर्माण झालेला आहे. या संदर्भात औद्योगिक न्यायालयाने तोडगा काढण्याचे आदेश देऊनही प्रशासन चर्चा करीत नसल्याने वेतनवाढीबाबत अद्यापही समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी याप्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करून कर्मचाºयांच्या हितासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतल्याचे म्हटले आहे.याचाच एक भाग म्हणजे बुधवार, दि. ३० रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे कर्मचारी उपोषणास बसणार असून, वेतन कराराबरोबरच इतर अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे. या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्यस दि. १ नोव्हेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विभागीय कार्यालयांसमोर कर्मचारी उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.कामगारांच्या सुट्या रद्दकर्मचाºयांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने कामगारांच्या सुट्या रद्द केल्याचे बालले जात आहे. मुंबईतील उपोषणास गर्दी होऊ नये तसेच कर्मचारी अन्य आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी अशाप्रकारचे पत्रक काढल्याची चर्चा आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने कर्मचाºयांनी सुट्या घेऊ नये असे पत्रक प्रशासनाने काढल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी दर्शविली. असे असले तरी मुंबईतील आंदोलनास राज्यातील कर्मचारी सहभागी होणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.