लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : योगा दिनाच्या निमित्ताने विद्या इंटरनॅशनल स्कूलने राबविलेल्या आॅनलाइन योगा या उपक्र मात शाळेच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आॅनलाइन योगा दिन साजरा केला गेला. वेबेक्स या अॅपवर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. मुलांनी आपल्या घरात बसून विविध योगासने सादर करीत या उपक्र मात सहभाग नोंदविला.योग हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. योगाने उंची वाढण्यास मदत होते. मन एकाग्र, शांत आणि प्रसन्न होते अशी माहिती शाळेचे क्र ीडाशिक्षक किरण कुलकर्णी व मोईज दिलावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिली.या उपक्र मात प्रामुख्याने पूरक व्यायामापासून सुरुवात करून नंतर ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, सूर्यनमस्कार, भद्रासन, वज्रासन आदी आसने करण्यात आली. याबरोबरच बस्तिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, ओंकार आदी प्राणायाम करण्यात आले. तर संस्थेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल व मुख्यध्यापक शुभांगी शिंदे यांनी आॅनलाइन योग दिनाचे महत्त्व विशद केले.
विद्या स्कूलच्या आॅनलाइन योगा उपक्र मात २५० विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 4:56 PM
येवला : योगा दिनाच्या निमित्ताने विद्या इंटरनॅशनल स्कूलने राबविलेल्या आॅनलाइन योगा या उपक्र मात शाळेच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ठळक मुद्दे मुख्यध्यापक शुभांगी शिंदे यांनी आॅनलाइन योग दिनाचे महत्त्व विशद केले.