खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद महामार्गावर बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे. सदर परिसरामध्ये अपघाती वळण व उंचवटा असल्याने रस्त्यावरील खड्यांचा आंदाज येत नसल्याने चालकांची तारंबळ उडत आहे.सदरील खड्यांमधुन वाहने आपटतात. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सततच्या पावसामुळे खड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. त्यामुळे खड्यांचा आंदाज येत नाही. त्यामुळे बऱ्याच वाहनांचे नुकसान सहन करावे लागलेले आहे.अपघाती वळण आणि खड्डे यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. बोकडदरे येथील टेकड्यावर असलेली हिरवी गर्द झाडे, अपघाती वळणे आणि त्यातच या परिसरातील रस्त्याची खड्डे पडुन रस्त्याची झालेली चाळण यामुळे प्रवाशी मेटाकुटीला आलेले आहे.वाहनांना वेग असल्याने खड्यातुन वाहने हेलकावे घेतात. त्यामुळे येथे सतत छोटे-मोठे अपघात होत आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेवुन रस्त्यांवरील खड्डे बुजवावे अशी मागणी शेतकरी, प्रवाशी व वाहन चालकांकडुन होत आहे.(फोटो ०५ खेडलेझुंगे, ०५ खेडलेझुंगे १)
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील खड्यांमुळे प्रवाशी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 9:16 PM
खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद महामार्गावर बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे. सदर परिसरामध्ये अपघाती वळण व उंचवटा असल्याने रस्त्यावरील खड्यांचा आंदाज येत नसल्याने चालकांची तारंबळ उडत आहे.
ठळक मुद्देरस्त्यांवरील खड्डे बुजवावे अशी मागणी शेतकरी, प्रवाशी व वाहन चालकांकडुन होत आहे.