ओझर : मुंबई - आग्रा महामार्गावरून गावाच्या दिशेने पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना राज्य परिवहन खात्याने दिलेल्या आदेशानुसार निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी पिंपळगाव टोलनाका येथून जवळपास साठ बसेसमधून प्रत्येकी २२ लोक परराज्यातील सीमेपर्यंत रवाना करण्यात आले. यावेळी सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर त्यांना जेवण व पाणी असे अत्यावश्यक वस्तू सोबत देण्यात आल्या.कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत असल्याने सर्वत्र लॉकडाउन लागू केले. परिणामी सर्व उद्योग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याने मजुरांच्या हाताला मिळणारे काम पूर्णपणे थांबले. त्यात मजुरांना उदरनिर्वाह करणे मुश्कील झाल्याने परप्रांतीय मजूर मिळेल ती वाहने पकडून गावाच्या दिशेने प्रवास करत आहेत. काही मजुरांकडून पैशांअभावी रस्त्यावरून पायी वाटचाल करण्याची वेळ ओढवल्याने ओझरपासून पिंपळगावपर्यंत मुंबई - आग्रा महामार्गावरून गावाच्या दिशेने पायी जाणाºया मजुरांना बसेसमधून पाठविले जात आहे. मजुरांच्या जेवणाची संपूर्ण व्यवस्था केल्याने मजुरांना दिलासा मिळाला आहे. यावेळी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, पिंपळगाव बसवंतचे मंडळ अधिकारी नीलकंठ उगले, ओझरचे मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, पिंपळगावचे तलाठी पंडित, ओझरचे तलाठी उल्हास देशमुख आदी उपस्थित होते.--------------राज्यशासनाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी ४० तर दुसºया दिवशी २० बसेस राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आल्या. प्रवाश्यांना टोल नाक्यांवर तपासणी करून त्यांना जेवण देऊन गाड्यांमध्ये बसवण्यात आले. सायकलींना देखील वरच्या कॅरेजवर जागा करून देण्यात आली. स्थानिक नागरिकांनी त्यासाठी सहकार्य केले.- दीपक पाटील,तहसीलदार, निफाड.
पिंपळगाव टोलनाक्यावर प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 9:20 PM