लोकमत न्यूज नेटवर्कनिºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील मºहळ बुद्रुक व मºहळ खुर्द या दोन गावांमध्ये जाम नदीवर असलेल्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी रहिवाशांसह प्रवाशांनी केली आहे.पावसाळ्यात पावसाचे पाणी पुलावरून वाहत असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करवा लागतो. मºहळ गावातून जाणारा महामार्ग नांदूरशिंगोटेहून थेट पांगरी, पंचाळे, सोमठाणे मार्गे विंचूर व पुढे लासलगाव, चांदवड, मालेगावपर्यंत जातो. पुणेमार्गे येणाऱ्या प्रवाशांना जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. मात्र मºहळ रस्त्यावर जाम नदीवर असलेल्या फरशीची उंची कमी असल्याने पुलावरून दोन फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह व नागरिकांची मोठी गैरसोय होते. जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागतो. सततच्या पाण्यामुळे या पुलावर शेवाळयुक्त पाणी तयार झाल्याने अनेक नागरिक व दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी मºहळचे कामगार पोलीसपाटील संदीप एकनाथ कुटे यांनी केली आहे.मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातील अनेक वाहने जवळपासचा मार्ग म्हणून या महामार्गावरून प्रवास करतात. मात्र अनेक ठिकाणी अरु ंद रस्ते, धोकादायक वळणे, नदीवर असलेले अरुंद पूल यामुळे वाहनधारकांना प्रवास करणे त्रासदायक वाटते. या मार्गावरील सव; छोट्या पुलांची उंची वाढविण्याची मागणी होत आहे़
मºहळ येथील पुलावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:24 IST
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील मºहळ बुद्रुक व मºहळ खुर्द या दोन गावांमध्ये जाम नदीवर असलेल्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी रहिवाशांसह प्रवाशांनी केली आहे.
मºहळ येथील पुलावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
ठळक मुद्देवाहनधारकांची कसरत । फरशीची उंची वाढविण्यासाठी नागरिकांचे साकडे