नाशिकरोड : गीतांजली एक्स्प्रेसमधून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरणारे मखमलाबादचे संतोष मंडोरे यांना हृदयविकाराचा झटका आला. सदर प्रकार लक्षात येताच रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करत मंडोरे यांना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्या जीवाचा धोका टळला.मखमलाबाद येथील संतोष काळुराम मंडोरे (३८) हे आपल्या पत्नी व मुलाबाळांसह शुक्रवारी दुपारी जळगाव येथून गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसले. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मंडोरे हे कुटुंबासह गीतांजली एक्स्प्रेसमधून उतरत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार, उपनिरीक्षक शरद सोनवणे, रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय गांगुर्डे, रवींद्र पाटील, चंद्रभान उबाळे, राहुल राजगिरे आदि प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असतांना त्यांना प्रवासी मंडोरे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात आले.पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत प्राथमिक उपचार करत व्हील चेअरवर बसवून प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आणले.
रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्रवाशाचे प्राण
By admin | Published: June 18, 2017 1:00 AM