येवला : शहरातील नववसाहतीसह पारेगाव, निमगावकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्याने गाडी तर सोडाच पण पायी चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे. संबंधित रस्ता हा बांधकाम विभागाकडे असल्याने वारंवार मागणी करूनदेखील कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांनाच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी स्वत:च्या खिशाला झळ पोहोचवत पुढाकार घेतला आहे. येवला-पारेगाव रस्त्यावर पडलेल्या अनेक परिसरातील ठिकठिकाणच्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम सध्या नववसाहतीतील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते बापू जाधव यांनी सुरू केले आहे.येवला-पारेगाव या रहदारीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी तर गटारीचे पाणी रस्त्यावरच सोडून दिलेले आहे. त्या ठिकाणी खड्डे पडून पादचाºयांसह वाहनचालकांनाही चालणे कठीण झाले होते. या रस्त्याची देखभाल कुणी करायची हा वादाचा प्रश्न असून, त्यामुळे हा प्रश्न सातत्याने दुर्लक्षित राहून नागरिकांचे हाल सुरू होते; मात्र याच रस्त्यावरील बाजीरावनगर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते बापू जाधव यांच्यासह नागरिकांनी पुढाकार घेत मुरमाच्या साह्याने या रस्त्यावरचे खड्डे तात्पुरते बुजविले. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून, त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जाते; मात्र भुजबळांनंतर या रस्त्याची अत्यंत दुरवस्था होण्याचे सुरू झाले आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्यावरून चालणेदेखील कठीण होत आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्या या नावालाच असून, त्यावरही झुडपे आलेली आहेत.
शहरातील पारेगाव, निमगावकडे जाणाºया नागरिकांनी स्वखर्चाने बुजविले रस्त्यावरचे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:10 PM