शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

इंडिगोचे विमान हैदराबादला पण प्रवाशांचे लगेज नाशिकलाच!

By संजय पाठक | Published: June 12, 2024 7:47 PM

२४ तास उलटून गेल्यानंतरही लगेज आलेच नसल्याने प्रवाशांचा संताप

नाशिक : इंडिगो कंपनीच्या नाशिक- हैदराबाद सेवेचा लाभ घेतलेल्या सुमारे 30 ते 35 प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. काल नाशिकहून गेलेल्या हैदराबादला गेलेल्या विमान प्रवाशांचे लगेज (समान) विमानात नेले नसल्याने या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले काल विमानतळावर गोंधळ घातल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व लगेज हैदराबाद येथे आणण्यात येईल असे आश्वासन इंडिगो कंपनीच्या वतीने देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आज 24 तास उलटून गेले तरी लगेज मिळालेले नाही तसेच इंडिगोच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रवाशांशी संपर्क साधण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिक- हैदराबाद ही इंडिगोची विमानसेवा काल दुपारी दोन वाजता होती. सुमारे 30 ते 35 प्रवासी नाशिकच्या ओझर विमानतळावरून बसले होते हवामान खराब असल्यामुळे विमान उड्डाणाला एक तास वेळ लागेल असे प्रवाशांना सांगण्यात आले त्यानुसार प्रवाशांनी प्रतीक्षा केली मात्र हैदराबाद येथे गेल्यावर त्यांचे लगेज आणण्यात आले नसल्याचे काही वेळाने सांगण्यात आल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. हवामान खराब असल्याने तांत्रिक कारणामुळे  विमानामध्ये लगेज आणणे शक्य नव्हते असे कंपनीचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, यामुळे प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली अगोदरच या संदर्भात कल्पना दिली असती तर निम्मे प्रवासी नाशिकहून आलेच नसते असे या प्रवाशांनी सांगितले नाशिक येथील एक प्रवासी आणि भाजपाचे कार्यकर्ते नितीन वानखेडे यांनी यासंदर्भात नूतन नागरी उड्डाण मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकIndigoइंडिगोAirportविमानतळ