नाशिक : दहावीच्या मुख्य परीक्षेत नापास झाल्यानंतर फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची विशेष फेरी राबवली जाणार असून, या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रियेचा भाग एक व दोन भरून द्यावा लागणार आहे. तर ८ सप्टेंबरला दुसºया विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना संधी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १ हजार ६८५ विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेता यावा यासाठी विशेष फेºयांचे नियोजन करण्यात आले असून, या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालये तथा उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सुमारे २१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
फेरपरीक्षा उत्तीर्ण; आजपासून आॅनलाइन प्रवेश अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 12:26 AM