शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

पेस्ट कंट्रोल ठेका मुदतवाढीस विरोध

By admin | Published: January 08, 2015 12:47 AM

स्थायी समिती : सुधारित प्रस्ताव ठेवण्याचे आदेश

नाशिक : शहरात डासप्रतिबंधक औषध व धूर फवारणीकरिता पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यास यापूर्वी अकरा वेळा स्थायी समिती आणि महासभेची कोणतीही मान्यता न घेता मुदतवाढ दिल्याचा मुद्दा महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. सदर ठेक्याला मुदतवाढ न देता नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्याची मागणी सदस्यांनी केली. साधक-बाधक चर्चेनंतर तातडीची बाब म्हणून सभापती राहुल ढिकले यांनी सदरचा सुधारित प्रस्ताव पुढच्या सभेत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले.पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला वारंवार दिल्या जाणाऱ्या मुदतवाढीचा विषय गेल्या काही महिन्यांपासून गाजतो आहे. यापूर्वी अकरा वेळा मुदतवाढ देऊनही पुन्हा एकदा मुदतवाढीचा प्रस्ताव आणल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. वंदना बिरारी यांनी मूळ निविदा दोन कोटी ३६ लाख रुपयांची असल्याचे सांगतानाच त्यात आणखी ४० लाखांची भर पडल्याचे सांगितले; मात्र महासभा आणि स्थायी समितीवर सदरचे मुदतवाढीचे प्रस्ताव का आणले नाही, असा सवाल उपस्थित केला. स्थायी समितीची मान्यता नसताना ठेकेदाराला कोणाच्या अधिकारात रक्कम अदा केली आणि प्रशासन कुणावर मेहेरबान असल्याचा आरोप केला. मुख्य लेखाधिकारी लांडे यांनी त्यावर खुलासा करताना सांगितले, मूळ रकमेच्या शंभर टक्क्याहून अधिकपर्यंतचे जादा काम असल्यास त्यासंबंधीचे अधिकार आयुक्तांना असल्याचे स्पष्ट केले. त्यावर शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायीच्याही जबाबदारीचे भान लक्षात आणून दिले. यावेळी गांगुर्डे यांनी मुख्य लेखाधिकारी लांडे यांच्यावर घणाघाती आरोप केले. तुम्ही सुधरा अन्यथा अरिष्ट कोसळेल, असा इशाराही दिला. लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या नस्तींवर अभिप्राय नोंदवूनही पुन्हा पुन्हा त्याच कामासाठी फाईली पाठविल्या जात असल्याचे सांगितले. यावेळी सभापतींनी सदरची मुदतवाढ रद्द करून अत्यावश्यक बाब म्हणून येत्या १५ दिवसांत नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले; परंतु आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी नवीन निविदाप्रक्रियेत जीपीएस आणि बायोमेट्रिकचा वापर केला जाणार असल्याने आणि त्यासाठी पुरेसा अवधी आवश्यक असल्याने मुदतवाढीच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती केली. यावेळी सदस्यांनी मुदतवाढीच्या प्रस्तावाला विरोध कायम ठेवत चौकशी समितीही नेमण्याची मागणी केली. अखेर सभापतींनी तातडीची बाब म्हणून पुढील सभेत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)