नाशिक येथील मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूलच्या प्रांगणात जिल्हास्तरीय टेनीक्वाईट सब ज्युनिअर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुले व मुलींच्या संघाने बाजी मारली. त्यामुळे या दोन्ही संघांची नांदेड येथे २५ ते २८ जुलै दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलांच्या संघाचे नेतृत्व संस्कार शिंदे याने केले. संघात प्रशांत रेवगडे, प्रणय बोगीर, आशुतोष रेवगडे, अनुराज रेवगडे यांचा समावेश होता. मुलींच्या संघाचे नेतृत्व अक्षरा रेवगडे हिने केले. संघात साक्षी पाटोळे, सानिका पाटोळे, पुजा रेवगडे, श्रावणी शिंदे, जयश्री शिंदे यांचा समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस. बी. देशमुख व क्रीडा शिक्षिका एम. एम. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी उपशिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे व ए. बी. थोरे उपस्थित होते. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाचे संस्थेचे अध्यक्ष गोविंद लोखंडे, सचिव प्रा. टी. एस. ढोली, समन्वयक अरुण गरगटे आदिंनी कौतुक केले आहे.
पाताळेश्वर विद्यालयाच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 5:04 PM