नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे मंगळवारी (दि़२०) पवित्र रामकुंडात विसर्जन करण्यात आले़यावेळी त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थित होते़. यावेळी कदम यांना श्रध्दांजली अर्पण करताना त्यांच्या स्मृतींना मान्यवरांनी उजाळा दिला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगीरथ शिंदे यांनी कदम यांनी बहुजन समाजासाठी खऱ्या अर्थाने शिक्षणाची कवाडे खुली केली़ रयत आणि भारती विद्यापीठ या दोन्ही संस्थांची बैठक एकावेळी असल्यास ते सर्वप्रथम रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीस प्राधान्य देत असल्याचे सांगितले़ तर एऩ एम़ आव्हाड यांनी, यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्यानंतर लोकांमध्ये रमणारे कदम हे नेते होते, असे सांगितले़ यावेळी माजी मंत्री शोभाताई बच्छाव, आमदार अपूर्व हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार शिरीष कोतवाल, अनिल अहेर, नानासाहेब बोरस्ते, नगरसेवक हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद अहेर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मुरलीधर पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, आशा तडवी, गणेश गिते, उदय सांगळे, राजेंद्र मोगल, स्वप्नील पाटील, भरत टाकेकर, उद्धव पवार, ज्ञानेश्वर चव्हाण, अश्विनी बोरस्ते, ज्युली डिसोझा, कुसुमताई चव्हाण, अर्जुन टिळे, अण्णा मोरे, दिगंबर गिते आदी उपस्थित होते़
पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 1:13 AM
नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे मंगळवारी (दि़२०) पवित्र रामकुंडात विसर्जन करण्यात आले़ यावेळी त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थित होते़
ठळक मुद्देविश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थितकदम यांना श्रध्दांजली अर्पण करताना त्यांच्या स्मृतींना मान्यवरांनी उजाळा दिला