नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे ग्रामपंचायतीच्या निधीतुन वीस हायमास्ट बसविण्यात आले आहे.गोंदे दुमाला येथे नवरात्रीनिमित्त काशाआई माता तसेच भवानी माता या देवींची दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. या नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून अनेक भाविक दररोज रात्री येत असल्यामुळे येथील भाविकांच्या सोयीकरीता गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतुन सरपंच जाधव यांनी दसऱ्याच्या आत एक दोन नव्हे तर तब्बल वीस हायमास्ट बसवून गोंदे दुमाला गावातील परिसर अक्षरश: उजळुन टाकला आहे. यामुळे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणे चौदाव्या वित्त आयोगातुन अठरा लाख रुपये निधी खर्च करुन गावातुन देवी मंदिराकडे जाणाºया मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. यामुळे गावातील परिसर स्वच्छ झाला आहे. जागोजागी सौर उर्जेवरील पथदिप बसविल्यामुळे परिसरात वेगळेच वातावरण तयार झाले आहे. याप्रसंगी गोंदे दुमाला ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
सौर उर्जेवरील पथदिपांनी उजळले गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 5:15 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे ग्रामपंचायतीच्या निधीतुन वीस हायमास्ट बसविण्यात आले आहे. गोंदे दुमाला येथे नवरात्रीनिमित्त काशाआई माता तसेच भवानी माता या देवींची दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. या नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून अनेक भाविक दररोज रात्री येत असल्यामुळे येथील भाविकांच्या सोयीकरीता गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतुन सरपंच जाधव यांनी दसऱ्याच्या आत एक दोन नव्हे तर तब्बल वीस हायमास्ट बसवून गोंदे दुमाला गावातील परिसर अक्षरश: उजळुन टाकला आहे.
ठळक मुद्देगोंदे दुमाला : वीस पथिदपांचे काम पुर्ण