चांदवड - तालुक्यातील पाथरशेंबे येथे सात वर्षाची मुलगी ठाणे येथून पाथरशेंबे आली होती. ती पॉझीटीव्ह आढळल्याने पाथरशेंबे नागरीक सतर्क झाले आहे. ग्रामपंंचायतीने तातडीने गावाच्या सिमा सिल केल्या असून संपुर्ण गावात औषधाची फवारणी केली आहे. चांदवडचे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी पाथरशेंबे गाव हे कंटनेमेंट झोन घोषीत केले आहे. गावामधील सर्वच व्यवहार दि. २३ मे पर्यंत पुर्णपणे बंद राहतील. तर दि. २४ मे पासून फक्त किराणा, मेडीकल, जीवनावश्यक वस्तुची दुकाने, पशुधन कृषी उघडणे व विक्री करणे द्वारपोहोच सामान भाजीपाला, दुध यासाठी ठरावीक वेळेत खुली राहतील. कंटेनमेंट झोन मधील नागरीकांनी मास्कचा वापर करावा, तर दररोज आरोग्य कर्मचारी , आरोग्य सहाय्यक , अंगणवाडी कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन सर्व्हे करुन काळजी घ्यावी असे आदेशात प्रांताधिकारी मिसाळ यांनी म्हटले आहे.
चांदवड तालुक्यातील पाथरशेंबे गाव कंटनेमेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 6:03 PM