दाभाडी : मालेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रचलित असलेले दाभाडी गाव आता कोरोना रुग्णांच्या सेवेसाठीही लौकिक झाले आहे. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मालेगावसह संपूर्ण तालुक्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली असतांना दाभाडीत सीसीई सेंटर उभारले गेले. याठिकाणी रुग्णांना उपचारासोबत पोषक आहार आणि मानसिक आधार देण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत.
मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांची क्वॉरंटाइन करण्याची सुविधा करण्यात आली होती. या सेंटरला शासनाकडून मिळालेल्या सुविधांअभावी रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून गावातील अनेक सामाजिक संस्थांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन कोरोना रुग्णांची सेवा केली. यामुळेच दाभाडीत उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात मागणी होती त्याचप्रमाणे यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आली असताना मालेगाव तालुक्याप्रमाणे दाभाडी गावातही कोरोनाचा शिरकाव झालेला असल्याने रुग्णांना योग्य उपचार व्हावा यासाठी दाभाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युक्त तीस बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आता या कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी शासनाप्रमाणेच दाभाडी गावातील अनेक सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवनेरी मित्रमंडळ, शिवसेना-युवासेना, माणुसकी फाउंडेशन, जिरेमाळी समाज सेवा संघ, ग्रामपालिका दाभाडी, भाग्यरत्न अंडा सेंटर, नवनाथ प्रतिष्ठान, प्रबंधभूमी ग्रुप आदींसह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना विविध प्रकारे सेवा देत समाजाला आदर्श घडवून दिला आहे.
दाभाडी येथील शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते नियमित कोविड सेंटर येथे जाऊन रुग्णांना लागणार्या गरजा पूर्ण करीत सुकामेवा वाटप करण्याचे काम सातत्याने करीत आहेत. मराठा महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष रुग्णांची भेट घेत त्यांना धीर देत विविध पोषक आहार व फळे वाटप करीत आहेत, लसीकरणासाठी आलेल्या बांधवांना पोषक आहार म्हणून भारतरत्न अंडा सेंटर यांच्याकडून बॉइल अंडेही वाटप करण्यात आलेत, लॉकडाऊन काळात कामे बंद असल्याने सामाजिक बांधिलकी जपत निराधार व गरीब कुटुंबांना मदतीचा हात म्हणून नवनाथ प्रतिष्ठानतर्फे किराणा व भाजीपाल्याचे वाटप करीत कोरोना रुग्णांना वाफेचे मशीन ही वाटप करण्यात आले. माणुसकी फाउंडेशनतर्फे कोरोना रुग्णांच्या घरी सेवा देत, कोरोनाने मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या अंत्यसंस्काराचे कार्य केले जात आहे. अशा अनेक संस्था कोरोना पेशंटच्या मदतीसाठी व सेवेसाठी धावून आल्याने येथील कोविड रुग्णांची संख्याही कमी होताना दिसून येत आहे.
यासाठी मराठा महासंघाचे अमोल निकम, हरिदादा निकम, रावसाहेब निकम, दीपक निकम, शिवसेना-युवासेनेचे प्रमोद निकम, नीळकंठ निकम, काकाजी निकम, शिवनेरी मित्रमंडळाचे मंगेश निकम, रोहित निकम, माणुसकी फाउंडेशनचे नानाभाई निकम, नवनाथ प्रतिष्ठानचे रावसाहेब निकम, संदीप निकम, शेखर निकम, भाग्यरत्न अंडा सेंटरचे प्रदीप निकम, संदीप निकम, दाभाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आशाबाई निकम, उपसरपंच अविनाश निकम माजी सरपंच सुभाष नहिरे, निरंकार निकम, शरद देवरे, दादाजी सुपारे, प्रबंधभूमी ग्रुपचे विशाल गोसावी, जिरेमाळी समाज सेवा संघाचे निलेश नहिरे, जगदीश मानकर आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व समाजसेवी संस्था कार्य करीत आहेत.
इन्फो...
लसीकरणासाठी आदर्शवत सुविधा
दाभाडी गावात लसीकरणासाठी नागरिकांना मिळणारी सोय की तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रशंसनीय आढळून येते. लसीकरणासाठी रांगेत असणाऱ्या नागरिकांना सावलीसाठी मंडप, बसण्यासाठी खुर्च्या, लस घेतलेल्या बांधवांना चहा, बिस्किटे, अंडे नियमित वाटप करण्यात येते. त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवून शिस्तीने नियमात लस देण्यात येते याच्या नियोजनासाठी ग्रामपालिका व मराठा महासंघ कडून विशेष नियोजन करण्यात येते.
कोट...
गावात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अनेक सामाजिक संस्था सरसावल्याने रुग्णांना पोषक आहाराबरोबर मानसिक आधार मिळत असल्याने कोरोना रुग्ण तत्काळ बरे होत आहेत. या सामाजिक संस्थांच्या कार्याने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
- सुभाष नहिरे, माजी सरपंच, दाभाडी
फोटो ओळी - १६ दाभाडी१
दाभाडीत कोविड सेंटरमधील रुग्णांना सुका मेवा व फळे वाटप करताना मराठा महासंघ व शिवसेना युवासेनेचे कार्यकर्ते.
===Photopath===
160521\16nsk_7_16052021_13.jpg
===Caption===
दाभाडीत कोविड सेंटरमधील रुग्णांना सुका मेवा व फळे वाटप करतांना मराठा महासंघ व शिवसेना युवासेनेचे कार्यकर्ते