शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:15 AM

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात भर पडत असताना कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घसरण होत आहे. फेब्रुवारी महिन्यात ...

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात भर पडत असताना कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घसरण होत आहे. फेब्रुवारी महिन्यात ९८ टक्क्यांवर असलेले कोरोनामुक्ततेचे प्रमाण मार्च महिन्याच्या अखेरीस १४ टक्क्यांनी घसरून ८४ टक्क्यांपर्यंत खाली पोहोचले आहे.

नाशिक जिल्ह्यात बाधित झालेल्या पावणेदोन लाख कोरोनाबाधितांपैकी १ लाख ४९ हजार ७८२ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्य:स्थितीत २६ हजार ०५८ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत २ हजार ३५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ४९३, चांदवड ५५७, सिन्नर ६३२, दिंडोरी ४१९, निफाड १ हजार १९५, देवळा ९५३, नांदगाव १ हजार १५, येवला ५८३, त्र्यंबकेश्वर ९७, सुरगाणा ८३, पेठ ५३, कळवण २५३, बागलाण ८७८, इगतपुरी ३२४, मालेगाव ग्रामीण ६१३ अशा एकूण ८ हजार १४८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १५ हजार २३३, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५९५, तर जिल्ह्याबाहेरील २१४ असे एकूण २५ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ६८२ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक ग्रामीणला ९५१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार १३३, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १९९ व जिल्ह्याबाहेरील ६८ अशा एकूण २ हजार ३५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इन्फो

कोरोनामुक्तची टक्केवारी

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८३ टक्के, नाशिक शहरात ८५.१८ टक्के, मालेगावमध्ये ७८.७५ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८७.४७ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.२४ इतके आहे.