यावेळी युवा नेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, नगरसेवक सोमनाथ पावसे, विजय जाधव, गोविंद लोखंडे, शैलेश नाईक, उदय गोळेसर, पिराजी पवार, बापूसाहेब पंडित, एम. जी. कुलकर्णी, मेघा पावसे, अण्णा शिंदे, वसंत गोसावी आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नगरसेवक पावसे यांच्यासह डॉ. आर. डी. नाईकवाडी, रावसाहेब आढाव, नीलेश काकड, ॲड. भगवान कर्पे, विकास महाजन, रवींद्र लहामगे, राजाराम मेंगाळ, सुनील ढाणे, डॉ. विनोद घोलप, बनू पगार आदींच्या सहकार्यातून हा कक्ष उभारण्यात आला असून परिसरातील गरजू रुग्णांना फायदा होणार आहे.
चार ऑक्सिजन बेड तसेच २५ बेडच्या विलगीकरण कक्षात ४ बेडला ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली आहे.
इन्फो
योगासनाचे धडे
रुग्णांना मोफत सुविधा देण्यात येणार असून कक्षामध्ये ऑक्सिजन वाढविणारी झाडे ठेवण्यात आली आहेत. कोविड रुग्णांसाठी योगशिक्षक वसंत गोसावी यांच्यातर्फे योगासनाचे धडे देण्यात येणार आहेत. जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत कक्ष चालू राहील, अशी माहिती नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी दिली.
फोटो- ०८ सिन्नर सरदवाडी
सिन्नरच्या संजीवनी नगरमध्ये २५ बेडचा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. त्याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, हेमंत वाजे, संजय केदार, सोमनाथ पावसे, विजय जाधव, गोविंद लोखंडे, शैलेश नाईक, उदय गोळेसर, पिराजी पवार आदी.