आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव यांनी पाहणी करून ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे कौतुक केले. बोरसे यांच्या सूचनेनंतर सोमपूर व जायखेडा येथे तात्काळ कोरोना उपचार केंद्र व विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
कोरोना रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन, बेड मिळत नाही. मात्र, याला अपवाद ठरवीत पिंपळकोठे येथील सरपंच किशोर भामरे, ग्रामसेवक योगेश भामरे व ग्रामस्थांनी ‘आपले गाव, आपली जबाबदारी’ या संकल्पनेतून संशयित रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत कोरोना उपचार सेंटर व विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत व लोकसहभागातून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र २० खाटांचा कक्ष उभारला आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना लागणारा औषधसाठा तयार केला असून, त्यासाठी औषध भांडारगृह तयार केले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली गावातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. विलास भामरे, डॉ. पोपट झाल्टे पाटील, डॉ. कुणाल भामरे, डॉ. युवराज देवरे मोफत उपचार देणार आहेत. याठिकाणी पंख्याची व्यवस्था, प्रत्येक बेडला सलाइनची व्यवस्था, रुग्णांना स्वतंत्र शौचालयदेखील तयार करण्यात आले आहेत, तसेच मनोरंजनासाठी टीव्ही संच ठेवले आहेत.
गावपातळीवरील या उपक्रमाची आमदार बोरसे, तहसीलदार इंगळे, गटविकास अधिकारी कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी आहिरराव, डॉ. नंदन, विस्तार अधिकारी नितीन देशमुख, भय्यासाहेब सावंत आदी अधिकाऱ्यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली.
कोट...
सरपंच म्हणून नाही, तर गावाचा ग्रामस्थ म्हणून मला अभिमान आहे. ग्रामस्थांबरोबर घेऊन कोरोना कक्ष सुरू केला. संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
-किशोर भामरे, सरपंच, पिंपळकोठे
फोटो कॅप्शन : १८ सटाणा ४
पिंपळकोठे येथे प्राथमिक शाळेत वीस खाटांच्या विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव, सरपंच किशोर भामरे, संजीवनी संदन, नितीन देशमुख, भय्या सावंत आदी.
===Photopath===
180421\18nsk_32_18042021_13.jpg
===Caption===
पिंपळकोठे येथे प्राथमिक शाळेत वीस खाटांच्या विलगीकरण कक्षाच्या उदघाटनप्रसंगी आमदार दिलीप बोरसे, तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडूरंग कोल्हे, तालूका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव, सरपंच किशोर भामरे, संजीवनी संदन, नितीन देशमुख, भैय्या सावंत आदी.