शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

पाटील, देसले यांचे अर्ज दाखल

By admin | Published: January 17, 2017 1:17 AM

पदवीधर निवडणूक : आज शेवटचा दिवस

 नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अंतिम एक दिवस आधीपर्यंत अवघ्या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवारी (दि.१६) भाजपाच्या वतीने डॉ. प्रशांत पाटील यांनी, तर माकपाच्या वतीने प्रकाश (राजू) देसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी भाजपाच्या वतीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार अपूर्व हिरे, आमदार उदय पाडवी, संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत डॉ. प्रशांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माकपाच्या वतीने राजू देसले यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. सुभाष लांडे, स्मिता पानसरे, सुनील मालुसरे, माकपा जिल्हासचिव व्ही. डी. धनवटे आदि उपस्थित होते. अपक्ष म्हणून महेश कडूस - पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी राकेश हांडे, प्रणव टोणपे, योगेश गुंड, शशिकांत अहिरे, चेतन पगार आदि उपस्थित होते. यापूर्वीच मनोज पवार (मालेगाव) व सुभाष डांगे (अहमदनगर) यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सोमवारपर्यंत एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)