शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

विहिरीत पडलेल्या हरणास पाटोदेकरांनी दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:25 AM

येथील आत्माराम महंत यांच्या विहिरीत पडलेल्या हरणास येथील रामेश्वर यात्रा कमिटीच्या नागरिकांनी रविवारी (दि.२१) दुपारी विहिरीतून बाहेर काढून व वैद्यकीय उपचार करून जीवदान दिले.

पाटोदा : येथील आत्माराम महंत यांच्या विहिरीत पडलेल्या हरणास येथील रामेश्वर यात्रा कमिटीच्या नागरिकांनी रविवारी (दि.२१) दुपारी विहिरीतून बाहेर काढून व वैद्यकीय उपचार करून जीवदान दिले.अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला असता जखमी अवस्थेत या कुत्र्यांच्या तावडीतून आपली सुटका करून पळताना व पुढे विहिरीचा अंदाज न आल्याने हरीण विहिरीत पडले. सुदैवाने ही बाब यात्रेसाठी वस्त्यांवर वर्गणी गोळा करणाऱ्या महेश मेंगाणे, दत्तू पिंपरकर, गणेश बैरागी, सचिन मेंगाणे, भाऊसाहेब ढोपरे, वाल्मीक बोराडे या रामेश्वर यात्रा कमिटीच्या सदस्यांच्या लक्षात आली. त्यांनी विहिरीत पडलेल्या हरणास दोरी व खाटेच्या साहाय्याने बाहेर काढले व त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनवटे यांच्याकडून उपचार करून वनविभागाच्या ताब्यात दिले.पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, विखरणी शिवारात वनविभागाचे हजारो हेक्टर जंगल असून, यात मोठ्या प्रमाणात वन्यजीव राहत आहेत. त्यात ससा हरीण, काळवीट, मोर यांचा समावेश आहे; मात्र यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने या प्राण्यांसाठी जंगलात पाण्याची सोय न केल्याने सर्वच प्राणी अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीचा आसरा घेत आहेत. या भागात शेकडो मोकाट कुत्र्यांचे टोळके वावरत आहे. हे मोकाट कुत्रे या वन्यप्राण्यांवर हल्ला करीत असल्याने या प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे वनविभागाने या जंगलात प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून पाण्याची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :forestजंगलNashikनाशिक