मालेगाव : बाल-संस्कार सेमी इंग्लिश स्कूल व नोबल कॉलेज आॅफ सायन्सचे स्नेहसंमेलन झाले. हिंदी व मराठी चित्रपटातील गीतांचा तसेच देशभक्तीपर गीत तथा सामाजिक व विनोदी नाटिकांसह विद्यार्थीदशेत होणारे मोबाइलचे दुष्परिणाम या विषयावर नाटिका सादर करण्यात आली. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांच्या समवेत नरेंद्र सोनवणे, विशाल लोढा उपस्थित होते. भोसले यांचे भाषण झाले. दुसºया सत्रात इंडियन बुटिक्सच्या संचालिका मनीषा दत्ताणी व दीपाली दुसाने, आझादनगरचे पोलीस निरीक्षक नोंद्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शेवटच्या दिवशी संस्थेअंतर्गत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. उपनिरीक्षक विशाल पाटील यांच्या हस्ते शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशाल पाटील म्हणाले, समाज घडविण्याचे कार्य करणाºया शिक्षकांचा गौरव करणे हा एक स्तुत्य उपक्रम असून, अशा प्रकारे त्यांचा आदर करून व त्यांना सन्मानित करून संस्थेने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. किरण शिंदे, मनीषा शिंदे, बालसंस्कारच्या मुख्याध्यापक अंजली पाटील, नोबल कॉलेजच्या प्राचार्य धन्वंतरी देवरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनात देशभक्तीपर गीते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:22 AM