कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यासाठी पाटविहीरकरांची १२ वर्षापूर्वी जमीन संपादित केली, सिंचनाची सोय होईल म्हणून कुणीही कालव्यांना विरोध केला नाही. कालव्यांना शेतजमीन सढळ हाताने दिली तरी त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. कालव्याच्या कामांची कहाणी होऊन कालवे झाले पण शेतापर्यंत काय गावापर्यंत अद्याप पाणीच पोहोचलेच नाही. त्यामुळे आज गावाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे पुनंदमधून आधी आम्हांला पाणी द्या मग इतरांचा विचार सरकारने करावा, तहानलेल्या आदिवासींची तहान भागवा एवढीच अपेक्षा पाटविहीरच्या आदिवासी जनतेने व्यक्त आहे१३ वर्षांपूर्वी पुनंद प्रकल्पांतर्गत सुळे येथील सिद्धेश्वर बंधाऱ्यापासून सुळे उजव्या कालवा काढण्यात आला. २१ कि.मी.चा कालवा पाटविहीर गावापर्यंत येतो. परंतु या कालव्याच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याने त्याची झळ या भागातील जनतेला बसत असून आज दुष्काळाशी दोन हात करत या गावातील महिला पाणी टंचाईचा मुकाबला करीत आहे. सुळे उजव्या कालव्याची दुरु स्ती होऊन देखील पाटविहीर गावापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. आता पुन्हा दुरु स्ती व अन्य कामे चालू आहे. या कालव्याचे पाणी पाटविहीर गावापर्यंत आल्यास येथील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार आहे.आज पाटविहीर गावात भीषण पाणी टंचाई आहे.आदिवासी महिलांना मिळेल त्या ठिकाणाहून पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे.
पाटविहीरकरांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 5:40 PM