महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाच्यावतीने सिडकोतील काही भागांत जुने रस्ते खोदून या ठिकाणी नवीन रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु पावसामुळे सिडको भागातील अनेक रस्त्यांना मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यावर डागडुजी अथवा पॅच मारण्याचादेखील विसर महापालिकेच्या बांधकाम विभागाला पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिडकोतील खांडे मळा परिसरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यातून वाहनधारकांना मार्ग काढणे देखील कठीण होत आहे. या ठिकाणी महापालिकेने खडीकरण करावे, अशी मागणी प्रभागाचे नगरसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे केली होती दरम्यान, महापालिकेला अखेरीस जाग आल्याने महापालिकेने खांडे मळा व परिसरातील संपूर्ण अंतर्गत रस्त्यांवर खडीकरण काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (फोटो २५ सिडको)
कोट.
खांडे मळा परिसरातील सदाशिव दर्शन, सदाशिव संकुल, वृंदावन अपार्टमेंट, सदाशिव शांती, सदाशिव रेसिडेन्सी,राजाराम हाईटस्, आदी भागांतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खराब झाले असल्याचे तसेच काही ठिकाणी रस्ता न केल्याने चिखलातून मार्गक्रमण करावे लागते. याबाबत महापालिकेला ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर या ठिकाणी खडीकरण कामाला सुरुवात करण्यात आली.
- अमित खांडे , खांडे मळा, स्थानिक रहिवाशी
फोटो ओळीं:
खांडे मळा परिसरात सुरू असलेले खडीकरणाचे काम