नांदुरवैद्य : घोटी ग्रामपालिका व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने डांगी जनावरांच्या प्रदर्शनात नांदूरवैद्य येथील पवन नामक अश्वाने प्रथम क्र मांक मिळविला आहे. या प्रदर्शनात नांदूरवैद्य येथील कैलास कर्पे यांच्या पवन या घोड्याने नांदूरवैद्य या गावाचे नाव रोशन केले आहे. या घोड्याला जिल्ह्यातून लग्नसमारंभ, तसेच मिरवणुका आदी कार्यक्र मांसाठी नृत्य करण्यासाठी खूप मागणी असते. याआधीदेखील या घोड्याने अनेक स्पर्धेत भाग घेत अनेक पारितोषिके मिळविली असल्याचे घोडामालक कैलास कर्पे यांनी सांगितले. या अश्वाने या सुरू असलेल्या प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मालक कैलास कर्पे यांचा सत्कार राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते रोख अडीच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर गावामध्ये वाद्यांच्या ठेक्यात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, कैलास कर्पे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
डांगी जनावरांच्या प्रदर्शनात पवन अश्व प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:26 AM