येवला : अनकुटे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाजीराव पवार यांची, तर उपाध्यक्षपदी अर्जुन गोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.विहित वेळेत अध्यक्षपदासाठी पवार व उपाध्यक्षपदासाठी गोरे यांचा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी लोंढे यांनी बिनविरोध निवड घोषित केली. निवडणूक कामात सचिव दाणे, सहसचिव प्रभाकर जाधव यांनी साहाय्य केले. या निवडीचे गावातून स्वागत करण्यात येत आहे.दरम्यान, निवड जाहीर होताच पदाधिकारी व समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक गायकवाड, भीमराज गायकवाड, महेंद्र पगारे, शिवाजी गायकवाड, रावसाहेब गायकवाड, रावसाहेब सोनवणे, दशरथ पवार, एकनाथ पवार, सुभाष पवार, शांताराम पवार, भाऊसाहेब पवार, विलास पवार, रतन पवार, भाऊसाहेब गोरे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)
अनकुटे सोसायटीवर पवार, गोरे बिनविरोध
By admin | Published: December 31, 2015 10:42 PM