लोहोणेर : ग्रामपंचायत लोहोणेर येथे ग्रामनिधी मधून ५ टक्के दिव्यांग निधी मधून ५ अपंगांना प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेशा अदा करण्यात आले.राहुल भिमराव निकम, सोमनाथ पेंगु पवार, मीना पुंडलिक धामणे, नटवरलाल सुंदरलाल राजपूत, विशाल बाळासाहेब देशमुख या पाच दिव्यांगाना अदा धनादेशाचे वाटप करण्यात आले. यापूर्वीही लोहोणेर ग्रामपंचायतीने एक लाख ७० हजार रुपये इतर दिव्यांगाना धनादेशाद्वारे वाटप केले असून सुमारे एक लाख ९५ हजार रुपये आता पर्यत लोहोणेर ग्रामपंचायतीने वाटप केले असल्याचे ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी सरपंच पूनम पवार, योगेश पवार, रमेश आहिरे, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, सतीश देशमुख, रतीलाल परदेशी, संजय सोनवणे, रामदास उशीरे, अशोक अलई, सुलतान शेख, संजय केले आदी उपस्थित होते.दरम्यान यावेळी दोन्ही डोळ्यानी अधू असलेले द्रुष्टीहीन मानस कॉम्पुटरचे संचालक विशाल बाळासाहेब देशमुख यांनी आपणास मिळालेला ५००० रुपयांचा दिव्यांग निधी राहुल निकम व मीना धामणे या गरजू अपंग व्यक्तींना विभागून देण्यात यावा असे जाहीर केल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
लोहोणेर येथे ग्रामनिधी मधूनपाच अपंगांना धनादेशा अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 6:53 PM
लोहोणेर : ग्रामपंचायत लोहोणेर येथे ग्रामनिधी मधून ५ टक्के दिव्यांग निधी मधून ५ अपंगांना प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेशा अदा करण्यात आले.
ठळक मुद्दे विशाल देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.