सिन्नर: तालुक्यात अतिवृष्टी, निसर्ग चक्री वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्यांनी डाळिंब बागेंचा विमा काढूनही संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्यांना ठेंगा दाखविण्यात आला असून नुकसानग्रस्तांना विमारक्कम मिळावी यासाठी सिन्नर तालुका शेतकरी संघटनेने तहिसलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले आहे.खरीप हंगाम 201 9 मध्ये एस.बी.आय. जनरल इन्युरन्स कंपनीचा इन्श्युरन्स काढला होता. तरी सिन्नर तालुक्यामध्ये डाळींब बाग शेतकर्यांनी 2019 मध्ये काढलेल्या खरीप हंगामामध्ये इन्श्युरन्स अतिवृष्टीमुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे संपुर्ण बागेचे 100 % नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे पंचनामे सुध्दा झाले होते. शासन दरबारी त्याचे रेकॉर्डसुध्दा झाले होते. मात्र इन्श्युरन्स कंपनीने शेतकर्यांस एकही रुपया दिला नाही व शेतकर्यांची पुर्ण वार्षिक उत्पन्न बुडाले, शेतकरी कर्जबाजारी झाला. इन्श्युरन्स कंपनीला काहीही फरक पडला नाही व आता परत नविन इन्श्युरन्स काढण्यासाठी जाहीरात चालु आहे. सर्व शेतकर्यांना त्यांचे झालेल्या नुकसानीचा इन्श्युरन्स त्वरीत कंपनीने शेतकर्याच्या खात्यावर पुर्णतः जमा करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपुर्ण जिल्ह्यात व राज्यात आंदोलन उपोषण करील असा इशारा देण्यात आला.निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, रमेश पगार, शांताराम पगार, बारकु पगार आदींसह शेतकर्यांची नावे व सह्या आहेत.