शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

पेड व्हॉट्स अ‍ॅपला पैसे देताय, सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 8:20 PM

आता व्हॉट्स अ‍ॅप पेड झालाय, म्हणून लगेच पैसे भरण्यासाठी उतावीळ होऊ नका, कारण अशाप्रकारची लिंक उघडून त्यात बॅँकेची माहिती भरली की तुम्हाला गंडा घातला गेलाच म्हणून समजा!

संजय पाठक/ नाशिक : आता व्हॉट्स अ‍ॅप पेड झालाय, म्हणून लगेच पैसे भरण्यासाठी उतावीळ होऊ नका, कारण अशाप्रकारची लिंक उघडून त्यात बॅँकेची माहिती भरली की तुम्हाला गंडा घातला गेलाच म्हणून समजा! त्यामुळे अशाप्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी अशा बोगस संदेशांना आणि लिंकला प्रतिसाद देऊ नका, अशी सूचना सायबर तज्ज्ञांनी दिली आहे.व्हॉट्स अ‍ॅप आॅडिट झालेल्या तरुणाईबरोबरच अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग करीत असतात. अनेकदा त्यात आर्थिक फसवणुकीचा धोका असू शकतो. सध्या व्हॉट्स अ‍ॅप पेड होत असल्याच्या पोस्टही फॉरवर्ड केल्या जातात. व्हॉट्स अ‍ॅप वापराचे एक वर्ष फ्री सबस्क्रीप्शन संपल्यानंतर त्याचे पैसे द्यावे लागतील अशाप्रकारची घोषणा व्हॉट्स अ‍ॅपने केली होती. मात्र कालांतराने म्हणजेच गेल्याच वर्षी जानेवारी २०१६ मध्ये ही सूचना रद्द करण्यात आली. परंतु त्यानंतरही आता व्हॉट्स अ‍ॅपवर एक संदेश येत असून, त्यात तुमचे एक वर्षाचे सबस्क्रीप्शन संपणार आहे. पुढील सेवा कायम सुरू ठेवण्यासाठंी पेमेंट करा, असा हा संदेश असून, त्याखाली त्याची लिंकही देण्यात आली आहे. ही कॉम्प्युटर वेबवर लिंक क्लीक केली की एक पेमेंट पेज उघडले जाते. त्यात बॅँक डिटेल्सची माहिती भरण्यास सांगितली जाते. विशेष म्हणजे संगणकाचा माउस त्यावर नेऊन क्लीक केले की, आपल्या बॅँकेची वेबसाईट उघडली जाते. त्यामुळे वापरकर्ता त्यावर पटकन आपली माहिती भरत जातो. परंतु येथेच घोळ होण्याची शक्यता आहे. कारण बॅँकेची ही वेबसाईटच फेक म्हणजे बनावट असते. आपली बॅँक म्हणून उपयोगकर्त्याने नेटबॅँकिंचा पासवर्ड त्यावर टाकला की, युजर आयटी आणि पासवर्ड मिळाला की, हॅकरचे काम सोपे. बॅँकेची खरी वेबसाईट उघडून काहीही व्यवहार करू शकतात, असे संगणक क्षेत्रातील अभ्यासक प्रा. योगेश हांडगे यांनी सांगितले. सध्या या प्रकारचे संदेश आणि फसवणुकीचे प्रकार इंग्लंडमध्ये सुरू असून, आता भारतातही प्रारंभ झाला आहे. सध्या बॅँकिंग व्यवहार आॅनलाइन करण्याचे प्रमाण जगभरात वाढले असून, भारतातही कॅशलेसवर भर दिला जात आहे, अशावेळी अशाप्रकारच्या हॅकर्सचे फावते आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन हांडगे यांनी केले आहे....कोणाकडूनच आॅनलाइन आर्थिक गोष्टींची सतत विचारणा होत असेल तर सायबर तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. तसेच अनोळखी मोबाइल नंबरवरून आलेली कोणीतही लिंक ओेपन करू नका आणि फसवणूक झालीच तर तत्काळ सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधावा.- प्रा. योगेश हांडगे, पुणे इन्स्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी