नाशिक : नियमिती कर्जफेड करूनही अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना पीक कर्ज मिळत नाही, ठेवीदारांच्या हक्काचे पैसे बॅँकेत गुंतविलेल्यांना अडचणीच्या काळात मदत मिळत नाही, पैसे काढून देण्यासाठी बॅँक कर्मचा-यांकडून पैशांची मागणी केली जाते अशा स्वरूपाच्या तक्रारी करीत शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. त्यावर बॅँकेने राज्य बॅँक व नाबार्डकडे सहाशे कोटी कर्जाचा प्रस्ताव पाठविला असून, राज्य बॅँकेने सकारात्मकता दर्शविल्याने लवकरच शेतक-यांना कर्ज पुरवठा करण्याची ग्वाही अध्यक्ष केदा अहेर यांनी दिली.जिल्हा बॅँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जुन्या कार्यालयात घेण्यात येवून सभासदांनी विषय पत्रिकेवरील तेरा विषयांना एकमुखी मंजुरी दिली. आयत्या वेळच्या विषयात मात्र सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करतांना बॅँकेच्या कारभा-यांना धारेवर धरले. सन २०१६-१७ च्या थकबाकीदारांचे कर्ज माफ करा तसेच वसुलीसाठी पाठविण्यात आलेल्या नोटीसा रद्द कराव्यात अशी मागणी करून शासनाकडून बोंडअळीचे अनुदान मिळूनही बॅँकेकडून ते शेतक-यांना दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. बॅँकेच्या आवाहनाला प्रतिसाद देवून कर्जाची नियमित परतफेड करणा-या सभासदांना पीक कर्ज नाकारून अन्याय केला जात असल्याची भावना विजय गांगुर्डे यांनी व्यक्त केली. नोटाबंदीमुळे पतसंस्थेच्या ठेवी बॅँकेत अडकून पडल्या असून, त्याची रक्कम त्वरीत देण्यात यावी अशी मागणी शांतीलाल अहिरे यांनी केली तर मोठ्या कर्जदारांना बोलावून त्यांच्याकडून वन टाईम सेटलमेंट करून कर्ज वसुली करावी, कर्जवसुलीतून कर्ज पुरवठा करण्यात यावा, सोसायट्यांच्या शेअरच्या रक्कमेवर व्याज द्यावे, माजी सैनिकांचे अडकलेले पैसे परत करा आदी मागण्या मांडण्यात आल्या. बॅँकेतून रक्कम काढून देण्यासाठी खातेदारांकडून दोन दोन हजार रूपयांची मागणी केली जात असल्याची तक्रारीही यावेळी करण्यात आली.सुमारे तासभर चाललेल्या या सभेत सभासदांच्या शंकाचे शिरीष कोतवाल यांनी समाधान केले त्यानंतर अध्यक्ष केदा अहेर यांनी, बॅँकेचे देणे फेडून सुमारे ९०० ते १००० कोटी रूपये शिल्लक राहतील अशी सध्याची परिस्थिती असून, कर्जमाफी, नोटाबंदीच्या धोरणामुळे बॅँक सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. परंतु लवकरच अशा परिस्थितीतून ती बाहेर पडेल. राज्य बॅँकेने ६०० कोटीचा कर्ज पुरवठा केल्यास नियमित कर्जफेड करणाºयांना प्राधान्यांने कर्जपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली. या बैठकीस सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पीक कर्ज, ठेवीदारांना तात्काळ पैसे द्या !
By श्याम बागुल | Published: September 08, 2018 5:02 PM
जिल्हा बॅँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जुन्या कार्यालयात घेण्यात येवून सभासदांनी विषय पत्रिकेवरील तेरा विषयांना एकमुखी मंजुरी दिली. आयत्या वेळच्या विषयात मात्र सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करतांना बॅँकेच्या कारभा-यांना धारेवर धरले. सन २०१६-१७ च्या थकबाकीदारांचे कर्ज माफ
ठळक मुद्देजिल्हा बॅँक सभा : खातेदारांचा संचालकांना तगादाबॅँकेतून रक्कम काढून देण्यासाठी खातेदारांकडून दोन दोन हजार रूपयांची मागणी