कळवण : कांद्याला प्रति किलो २० रु पये दर देण्यात यावा आणि त्यामधील दुरावा शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करावा, अशा आशयाचे निवेदन देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना कळवण दौºयात साकडे घातले.कांदा उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने तो कवडीमोल दराने विकला जात आहे. शासनाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी शेतकरी नेते देविदास पवार यांनी केली. शेतकºयांचा कांदा उत्पादन खर्च ११ ते १२ रु पये येत असून कांदा आज ५ ते ६ रु पये दराने विकला जात आहे. यामुळे शेतकºयांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही.दर वाढल्यानंतर सरकार विदेशातून कांदा आयात करत दर पाडण्याचे काम करते. कांदा उत्पादकांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने २० रु पये दराप्रमाणे कांदा खरेदी करून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, जगन्नाथ पाटील, घनश्याम पवार, विनोद खैरनार, प्रविण जाधव, दादाजी जाधव हंसराज वाघ, माणिक देवरे, संजय शेवाळे,कौतिक गांगुर्ड यासह शेतकरी उपस्थित होते.
कांद्याला प्रतिकिलो २० रुपये दर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 8:39 PM