शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

उर्दू शिक्षक भरतीवर विशेष लक्ष देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:40 AM

मालेगाव : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीतील उर्दू माध्यमाच्या रिक्त जागा भरण्यावर विशेष लक्ष देऊ तसेच दुसऱ्या शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता ...

मालेगाव : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीतील उर्दू माध्यमाच्या रिक्त जागा भरण्यावर विशेष लक्ष देऊ तसेच दुसऱ्या शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी टीईटी परीक्षेसंदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले. मुंबई येथे अधिवेशनात राज्य सरचिटणीस साजीद निसार अहमद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट घेतली. उर्दू शिक्षक संघाचे १६१ दिवस राहत्या घरी धरणे आंदोलन, डिग्री जलाव आंदोलन, संकल्प दिवस, बेरोजगार दिवस आंदोलन, पोस्ट कार्ड आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने शिक्षक भरतीला विशेष परवानगी दिली, राज्यात शिक्षणसेवक भरती पवित्र प्रणालीमार्फत सुरू करण्यात आली होती, या भरतीमध्ये उर्दू माध्यम शिक्षक पदभरतीकरिता ९६६ एवढ्या तुटपुंज्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त २६९ पदे भरण्यात आली असून, ६९७ जागा रिक्त राहिल्या, या जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट करूनसुद्धा दुसऱ्या टप्प्यात फक्त १७७ पदे भरून ५२० च्या जवळपास जागा रिक्त ठेवून उर्दू माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उर्दू माध्यमासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षणसेवक पदभरतीसाठी दुसरा टप्पा सुरू करण्यास परवानगी देऊन, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टीईटी परीक्षेची तारीख जाहीर करावी, अशी मागणी उर्दू शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली.