चौकट-
वांगी ४० रु. किलो
फळभाज्यांच्या दरामध्ये तेजी आल्याने वांग्याला ४० रुपये किलोचा दर मिळत आहे. टोमॅटोची आवकही घटल्याने सध्या टोमॅटोच्या क्रेटला बऱ्यापैकी दर मिळत आहे.
चौकट-
साखर ४४ रु. किलो
किराणा बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली असून, ३७-३८ रुपये किलोने विकली जाणारी साखर सध्या ४२-४४ रुपये किलो या दराने विकली जात आहे. महिनाअखेर असल्याने ग्राहकी मंदावलेली दिसते. इतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत.
चौकट-
डाळिंबाची आवक वाढली
नाशिक बाजार समितीतील फळबाजारात डाळिंबाची आवक वाढली असल्याचे दिसून आले. डाळिंबाला सध्या ८० ते १०० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. किरकोळ बाजारातील विक्रेत्यांकडे सर्वच प्रकारच्या फळांचे भाव चढेच असल्याचे दिसून आले.
कोट-
तेलाचे दर उतरल्यामुळे दिवाळी, दसऱ्याच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, यंदाची दिवाळी आनंदात जाईल अशी तरी सध्या चिन्हे दिसत आहेत. येत्या काळात ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह वाढण्यास यामुळे मदत होईल.
- अनिल बुब, किराणा व्यापारी
कोट-
खूप दिवस टोमॅटोचे दर पडलेले असल्यामुळे आता जरी दर वाढले तरी त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. कारण सुरुवातीला नुकसान सहन करून टोमॅटो विकावे लागले आहेत. आता मालही सरत आला आहे.
- नामदेव रसाळ, शेतकरी
कोट-
तेल कमी झाले, तर दुसरीकडे लगेचच भाज्या कडाडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट काही कमी होणार नाही. खर्चाची तोंडमिळवणी करण्याची कसरत आम्हाला करावीच लागणार आहे. यातून सर्वसामान्यांची सुटका नाही. - कल्पना पाटील, गृहिणी