खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे.सुरवातीला कडक उन्हाळ्यामुळे शेत पीके पाण्याअभावी जळाली. जुन-जुलै महिना पावसाची वाट पाहण्यात गेला. परतीच्या पावसाने तर कहरच केला. परतीच्या पावसामुळे पिक अक्षरश: सडुन गेलीत. या दोन्ही ऋतुमध्ये फक्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिके जळाली, नंतर अती पाण्यामुळे पिक सडली त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही हंगमातील पिक वाया गेल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झालेले आहे.परतीच्या पावसामुळे महागडे पिक म्हणुन ओळखले जाणाºया द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यामध्ये बºयाच शेतकºयांनी द्राक्ष बागा तोडल्या. तसेच उरलेल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी जीव ओतुन प्रयत्न करत आहे. दिवसाची सुरवात होण्याआधीच औषध फवारणीचे कामकाजाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकरी शेतात पिकांकडे लक्ष देवुन असतात.खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे.गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन पडुन असल्याने व जमिनीचा पोत टिकवून असल्याने यंदा पिके चांगलीच बहरली होती. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतांना व पीक पूर्ण परिपक्व झालेले असतांना अचानक परतीच्या पावसाने गेल्या मिहन्यात सरासरी पंधरा दिवसांच्यावर मुक्काम ठोकला होता.या अचानक आलेल्या परतीच्या पाऊसरु पी नैसिर्गक संकटाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सोंगलेले धान्य जमिनीत सडले. शेतात उभे असलेले पीकही सडली. भाजीपाला आण िफळभाज्यांवर विविध रोगांनी थैमान घातले.त्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान होवुन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. खरीप हंगामातील जवळपास नव्वद टक्के पिकांचे नुकसान झाले. हे सर्व सहन करत शेतकरी राजा पुन्हा एकदा रब्बी पिके शेतात उभी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. यंदा भरपुर पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार होतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.गहु हरभरा आणि भाजीपाल्याला पसंतीअनेक भागांत भौगेलीक रचनेनुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरु झाला आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीतही भाजीपाला फळभाज्या घेण्यास शेतकर्यांनी सुरवात केली आहे. अवकाळी पवसाने उन्हाळा कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांद्यासाठी शेत पिडक ठेवण्यापेक्षा अनेक शेतकरी गहू हरभरा या पिकांना पसंती देत आहेत.(फोटो २६ खेडलेझुंगे, २६ खेडलेझुंग १)े
शेतकरी राजा नव्या जोमाने रब्बीसाठीसज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 5:54 PM
खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे.
ठळक मुद्देखेडलेझुंगे : भरपुर पाण्यामुळे भाजीपाला, फळभाज्या घेण्यास सुरवात