नाशिक : महानगरपालिका, टीसीएसच्या डिजिटल इंपॅक्ट स्क्वेअर आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाºया पेडल तथा सायकल शेअरिंग या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याने आता शहरातील अन्य पाच ठिकाणीही त्याचे स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव टीसीएसने दिला आहे. त्यामुळे लवकरच काही जॉगिंग ट्रॅकवरही सायकल शेअरिंगचा लाभ घेता येणार आहे.स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बोस्टन (अमेरिका) शहराच्या धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्र म राबविण्यात येत आहे. चेन्नईस्थित एसआरएम युनिव्हर्सिटीच्या अभियांत्रिकीच्या तिसºया वर्षात शिकणाºया विद्यार्थ्यांच्या संशोधक टीमने ही संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा उभारली आहे. यात पेडल कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेल्या स्वॅपिंग यंत्रात आपले सदस्यत्व असलेले स्मार्ट कार्ड स्वाईप केल्यानंतर सायकल वापरता येते. पेडल टीमने या प्रकल्पावर काम करत विविध सर्व्हे केल्यानंतर गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर या उपक्रमाची पाच महिन्यांपूर्वी सुरुवात केली होती. सुरुवातीला कान्हेरे मैदानावर टीआय सायकल्समार्फत सहा सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता त्यात आणखी तीन सायकलींची भर पडली असून, सुमारे चारशेच्या आसपास नागरिकांनी आपले सदस्यत्व नोंदवले आहे. सायकल शेअरिंगला मिळालेला प्रतिसाद पाहून आता टीसीएसने कृषीनगर, आकाशवाणी टॉवरजवळील समर्थ, इंदिरानगर आणि गोविंदनगर या जॉगिंग ट्रॅकवरही ‘पेडल’चा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी टाटा स्ट्रायडर्स, सपट व टीआय सायकल्स यांच्याकडे प्रस्ताव दिले आहेत. कान्हेरे मैदानावरआणखी एक स्टेशनहुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर राबविण्यात येणाºया उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून टीसीएसच्या संशोधक टीमचा हुरूप वाढला आहे. त्यामुळे कान्हेरे मैदानावर आणखी एक स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सायकलींची संख्याही वाढणार आहे.
‘पेडल’ उपक्रम शहरात पाच ठिकाणी राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:17 AM