नामपूर : नवरात्रोत्सवात नाशिक जिल्ह्यात १६ कुलस्वामिनींच्या दर्शनासाठी अनेक दिंड्यांनी पदयात्रेच्या माध्यमातृन कुलस्वामिनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातून हजारो भाविकांनी पायी प्रवास करुन कुलस्वामिनी मंदिरात दर्शन केले. यावेळी नाशिककर कुलस्वामिनी भक्तांनी सोळा कुलस्वामिनींचा एक रथ तयार करुन तो शेवटच्या मंदिरापर्यंत दर्शनासाठी नेला. शनिमांडक, बेटावद, शिंदखेडा, पाटण, कापडणे, धुळे आदी गावातील जोगेश्वरी, अन्नपूर्णा, सुलाईमाता, मठांबा, धनाई, पुनाई, पेडकाईमाता, एकवीरा, सप्तशृंगी आदी सोळा कुलस्वामिनींच्या दर्शनासाठी लाडशाखीय वाणी समाजातील भक्तगण नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून पदयात्रेला सुरुवात करुन या पदयात्रेचा समारोप कुलाचारी बांधव आपल्या कुलदेवतेजवळ दर्शन घेऊन व विविध कार्यक्रम घेऊन पदयात्रेची सांगता करतात. या दरम्यानच्या कार्यक्रमात कुलस्वामिनीजवळ दुर्गासप्तशतीचे पाठ, देवीस्तवन स्तोत्र मंत्रोच्चार, विविध आरत्या आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पदयात्री भाविकांच्या पिंपळगाव (ब), उमराणे, मुंगसे, वडाळीभोई, आर्वी, झोडगे, लळींग, धुळे, सोनगिर आदी ठिकाणी रात्री दिंड्या थांबतात, तेथेही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व त्या-त्या ठिकाणचे अन्नदाते भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था करतात.नाशिकहून राम बधान व देवीदास ततार यांच्या ंिदंडीत शंभराहून अधिक पदयात्री येतात तर रावळगाव, वडनेर खाकुर्डी, अजंग, वडेल येथील दिंडी बापू कोठावदे १३५ भाविकांना कुलस्वामिनी दर्शनाला नेतात तर नामपूरच्या दिंडी स्वतंत्र असते. या दिंडीत फक्त नामपूर गावचे ५३ पदयात्री १६ कुलस्वामिनींचे भाविक सहभागी होतात. नामपूरचे शरद नेरकर या भाविकांना चिराई देवी, म्हसदीची देवी, नेर-कुसुंबा, धुळे या मार्गाने सोळा कुलस्वामिनींना घेऊन जातात.या पदयात्रेत राम बधान, देवीदास ततार, शरद नेरकर, भालचंद्र कोठावदे, चारुदत्त बधान, अजय कासोदेकर, शिरीष नेरकर, सुनील नेरकर, दिलीप पाटकर, माणिक कोठावदे, बापू कोठावदे, रमेश ततार व विजय सोनजे हे प्रयत्नशील राहतात.
कुलस्वामिनींच्या दर्शनासाठी पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:49 PM