शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

पिळकोस पुलाचा भराव गेला वाहून

By admin | Published: August 04, 2016 12:56 AM

पिळकोस पुलाचा भराव गेला वाहून

 पिळकोस : कळवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधारेने गिरणा नदीवरील पिळकोस - बगडू पुलाचा भराव वाहून गेला. या ठिकाणी मोठे भगदाड पडले असून, अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त आहे.बगडू-बेज बाजूकडील डोंगरावरील पावसाचे सर्व पाणी उतारामुळे राज्य महामार्ग क्र. १७च्या रस्त्यावरून नदीकडे प्रवाहित होत असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या समोरील उतारावरील रस्त्याच्या कडेचा भराव वाहून गेला असून, त्या ठिकाणी खड्डा पडला आहे व रस्त्यालाही पावसाच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे काप लागली असून, दोन्ही बाजूला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या रस्त्याला कायमस्वरूपी टिकाऊ असा भराव करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. पावसाळ्यात या पुलावर उताराचे पाणी येते व त्याबरोबर गाळही वाहून येतो; परंतु संबंधित विभागाकडून रस्त्याला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारी केल्या गेल्या नसल्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे तरी संबंधित विभागाने या रस्त्याला कायमस्वरूपी दगडी भराव करून रस्ता वाहतुकीस योग्य करावा व पुलाच्या दोन्हीही बाजूच्या रस्त्याला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारी कराव्यात, अशी मागणी बाळासाहेब अहेर, राहुल सूर्यवंशी, मंगेश अहेर, राहुल अहेर, युवराज शिंदे, अनिल जाधव, श्रीधर वाघ यांनी केली आहे. (वार्ताहर)