नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाकडून टिळकवाडी सिग्नलकडे येण्यास वाहनांना बंदी केलेली असतानाही या मार्गावरून उलट दिशेने वाहने चालविणाºया वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने गुरुवारी (दि़ १) दंडात्मक कारवाई केली़ याप्रमाणेच शहरात २६ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीत ७२८ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे़पंडित कॉलनी ते टिळकवाडी या रस्त्यावर होणाºया वाहतूक कोंडीमुळे पोलीस आयुक्तांनी हा एकेरी मार्ग घोषित करून या मार्गावरून उलट दिशेने वाहन चालविण्यास मनाई आहे़ वाहतूक शाखा व सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये १०६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पाच शासकीय वाहने तसेच विविध विभागांतील दहा शासकीय कर्मचाºयांच्या खासगी वाहनांचाही समावेश आहे़ पंडित कॉलनी परिसरात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले़ दरम्यान, गुरुवारी शहरात २६ ठिकाणी स्थानिक पोलीस ठाणे व वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन तपासणी करण्यात आली़ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ७२८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणाºया २४२ वाहनांवर ‘नो-पार्किंग’च्या केसेस करण्यात आल्या़
वाहनांना बंदी केलेली असतानाही ७२८ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:12 AM
नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाकडून टिळकवाडी सिग्नलकडे येण्यास वाहनांना बंदी केलेली असतानाही या मार्गावरून उलट दिशेने वाहने चालविणाºया वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने गुरुवारी (दि़ १) दंडात्मक कारवाई केली़
ठळक मुद्देवाहतूक कोंडीमुळे हा एकेरी मार्ग घोषित १०६ वाहनांवर दंडात्मक कारवाई