शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:46 AM

: घारपुरे घाट, जोशीवाडा, मल्हारखाण झोपडपट्टी आदी ठिकाणच्या शौचालयांची दयनीय स्थिती, प्रभागातील ब्लॅकस्पॉट, अनियमित येणारी घंटागाडी अशा प्रश्नांची सरबत्ती करत नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिका-यांना धारेवर धरले.

नाशिक : घारपुरे घाट, जोशीवाडा, मल्हारखाण झोपडपट्टी आदी ठिकाणच्या शौचालयांची दयनीय स्थिती, प्रभागातील ब्लॅकस्पॉट, अनियमित येणारी घंटागाडी अशा प्रश्नांची सरबत्ती करत नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिका-यांना धारेवर धरले.  महानगरपालिका पश्चिम प्रभाग समितीची मासिक बैठक मंगळवारी (दि.२८) पार पडली. यावेळी सभापती वैशाली भोसले, नगरसेवक वत्सला खैरे, हेमलता पाटील, योगेश हिरे, योगीता भामरे यांच्यासह महापालिकेचे नितीन नेर, नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे, उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  घंटागाडी नियमित येऊनही शहरात ठिकठिकाणी लोक कचरा टाकत असून अशा ब्लॅकस्पॉटवर कचरा टाकणा-यांवर आता बिनधास्त दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सभापती भोसले यांनी दिले आहेत. कच-याचे वर्गीकरण करून न देणाºया हॉटेल्सवरही कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जोपर्यंत लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटत नाही, कचरा वर्गीकरणाची सवय लागत नाही तोपर्यंत वारंवार प्रबोधन करावे, दंडात्मक कारवाई करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.  घंटागाड्यांची जीपीएस यंत्रणा नीट कार्यान्वित आहे का याची तपासणी करून घ्यावी, घंटागाडी कर्मचाºयांना नागरिकांशी चांगले वागण्याच्या सूचना द्याव्यात, रस्ते झाडणाºया काही कर्मचाºयांबाबत नागरिकांच्या तक्रारी असून त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे यासाठी त्यांच्या मुकादमांना सूचना देण्याविषयी सांगण्यात आले.अशा आहेत मागण्याअग्निशमन दलाकडे साहित्य, प्रशिक्षण आदी गोष्टी व्यवस्थित असून, मनुष्यबळ वाढवून मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वाहत्या ड्रेनेजबाबत संबंधितांना तत्काळ नोटीस बजवावी, असे आदेशही यावेळी देण्यात आले. गाडगे महाराज दवाखाना पूर्ववत सुरू करावा, अशा सूचना देण्यात आल्या. आडव्या-तिडव्या वाढलेल्या झाडांच्या फांद्या लवकरात लवकर कापल्या जाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान