कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणे सुद्धा मुश्किल झाले आहे. विनाकारण नागरिकांनी फिरू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही काही नागरिक जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारायला व व्यायाम करीत आहेत. त्याची दखल घेत महापालिकेचे पूर्व विभागाच्या आरोग्य विभाग व इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि २९) रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यास बंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्या व व्यायाम करणाऱ्या तीन नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे एकूण दीड हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ, मनोज परदेशीसह कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली आहे.
जॉगींिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:13 AM